Advertisement

MPSC पोलीस उपनिरीक्षक भरतीतील शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल

याबाबतची सूचना राज्य लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सुधारित निकष २०२० च्या होणाऱ्या परीक्षेपासून लागू होणार आहेत.

MPSC पोलीस उपनिरीक्षक भरतीतील शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल
SHARES

एमपीएसी (MPSC)  मार्फत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याबाबतची सूचना राज्य लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सुधारित निकष २०२० च्या होणाऱ्या परीक्षेपासून लागू होणार आहेत.

पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. या सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांचे बेरीज अपुर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.

 शारीरिक चाचणीचा तपशील 

पुरुष

गोळाफेक – वजन ७.२६० कि.ग्रॅ. – कमाल गुण – १५

पुलअप्स – कमाल गुण – २०

लांब उडी – कमाल गुण – १५

धावणे (८०० मीटर) – कमाल गुण – ५०

महिला

गोळाफेक – वजन ४ कि.ग्रॅ. – कमाल गुण – २०

धावणे (४०० मीटर) – कमाल गुण – ५०

लांब उडी – कमाल गुण – ३०



हेही वाचा -

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी?

राज्यात मंगळवारी २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा