Advertisement

राज्यात मंगळवारी २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण

राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात मंगळवारी २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण
SHARES

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची (corona patients ) संख्या घटत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी राज्यात २४ हजार १३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

मंगळवारी ६०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के  आहे. तसंच राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

मुंबईत (mumbai) १०३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १ हजार ४२७ रुग्ण बरे झाले. आजपर्यंत बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ५५ हजार ४२५  झाली आहे. मंगळवारी मुंबईत ३७  रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील मृतांची एकूण संख्या १४ हजार ७०८ इतकी झाली आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख २६ हजार १५५ (१६.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६ लाख १६ हजार ४२८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २० हजार ८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊन ३ लाख १४ हजार ३६८ झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक ४५ हजार ६४८ आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २७ हजार ८५५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या २३ हजार ७०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या १४ हजार ५५६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ७९३ इतकी आहे.

अहमदनगरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ८८५ तर औरंगाबादमध्ये ५ हजार ९९२, नांदेडमध्ये ३ हजार ७६ ,जळगावमध्ये ७ हजार ४८३,  रायगडमध्ये ५ हजार ४७७ आहे. अमरावतीत ही संख्या ८ हजार ६५५, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ५१७ आहे.हेही वाचा - 

आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती

COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा