Advertisement

हार्डवेअर, छत्र्या-रेनकोटची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय

राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे दुकानं (Shops) बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत असून ग्राहकांचीही गैरसोय होत आहे.

हार्डवेअर, छत्र्या-रेनकोटची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय
SHARES

राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे दुकानं (Shops) बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत असून ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. व्यापारी वर्गातून दुकाने उघडण्यासाठी मागणी केली जात आहे. येणारा पावसाळा लक्षात घेता व्यापार्‍यांकडून बांधकाम क्षेत्रातील दुकान उघडे ठेवण्याची विनंती करण्यात येत होती. 

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आहे. तसंच राज्य सरकारने छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची दुकानं आणि छत्री, रेनकोटची दुकानं उघडता येणार आहेत.

तौक्ते चक्रीवादळामुळे (cyclone tauktae) कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड होऊन मोठं  नुकसान झालं आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील, अशा साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शहरांमध्येही हार्डवेअर आणि पावसाळी साहित्याची दुकाने सुरु करता येतील. अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी देण्यात आलेल्या वेळेतच ही दुकाने सुरु राहतील. मात्र, कोविड नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात घरांची शाकारणी, त्याचप्रमाणे शहरी भागात गळती असणाऱ्या ठिकाणी ताडपत्री लावून बंदोबस्त करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.



हेही वाचा -

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी?

राज्यात मंगळवारी २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा