अाणीबाणीवरून राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्लास्टिक बंदीविरोधात अावाज उठवत राज्य सरकारवर हल्ला चढवणाऱ्या राज ठाकरे यांनी संध्याकाळी व्यंगचित्राद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकेचे लक्ष्य केलं.

आणीबाणी लादण्याचा निर्णय हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता, असं मोदी मुंबईतील कार्यक्रमात म्हणाले होते. त्याचाच संदर्भ घेऊन राज ठाकरे यांनी मोदींवर हल्ला चढवला अाहे.

व्यंगचित्रात काय?

इंदिरा गांधी हिटलर वृत्तीच्या होत्या! त्यांनी देशात अाणीबाणी लादली! विचार अाणि वाणीस्वातंत्र्याच्या मुसक्या अावळल्या! अाणीबाणी ही एक भयानक गोष्ट अाहे!!! असं म्हणणारे नरेंद्र मोदी हे रिझर्व्ह बँक, निवडणूक अायोग, उद्योगपती, वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन चॅनेल या सर्वांना पायाखाली तुडवत सर्वांवर राज्य करत असल्याचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटलं अाहे. अाणि या व्यंगचित्राला त्यांनी 'लोका सांगे...!' अशी टॅगलाइन देऊन मोदींना चांगलाच टोला लगावला अाहे.


हेही वाचा-

निवडणूक फंडासाठी प्लास्टिक धोरण, राज यांचा आरोप

घटनेचा खून करणारेच आता घटनेची काळजी करताहेत- मोदी


पुढील बातमी
इतर बातम्या