Advertisement

घटनेचा खून करणारेच आता घटनेची काळजी करताहेत- मोदी

केवळ सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याच पक्षाची वाट लावत देशाचा कैदखाना केला होता, आणीबाणी हे काँग्रेसचं पाप आहे. ज्यांनी घटनेचा खून केला, तेच आता घटनेची काळजी करू लागलेत,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जहरी शब्दांत टीका केली.

घटनेचा खून करणारेच आता घटनेची काळजी करताहेत- मोदी
SHARES

'काँग्रेसने गांधी घराण्यासाठी संविधानाचा दुरुपयोग करत देशात आणीबाणी लागू केली. केवळ सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याच पक्षाची वाट लावत देशाचा कैदखाना केला होता, आणीबाणी हे काँग्रेसचं पाप आहे. ज्यांनी घटनेचा खून केला, तेच आता घटनेची काळजी करू लागलेत,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जहरी शब्दांत टीका केली.



देशात आणीबाणी लागू होण्याच्या घटनेला ४३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाने मरिन लाइन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहात संवाद सभेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात सहभागी होत पंतप्रधान मोदींनी लोकशाही आणि आणीबाणीवर उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमात आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा गौरवही करण्यात आला. 



काय म्हणाले मोदी?

  • स्वार्थासाठी गांधी घराण्याने पक्षाचे तुकडे केले
  • आणीबाणीदरम्यान संपूर्ण देशच कारागृह झाला होता 
  • काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात आली 
  • आणीबाणी आणि महाभियोग ही काँग्रसची मानसिकता 
  • एका कुटुंबासाठी घटनेचाही दुरुपयोग करण्यात आला
  • आणीबाणी दरम्यान किशोर कुमार यांच्या गाण्यावरही बंदी घातली होती
  • राजीव गांधी मीडियासोबत कसे वागले माहीत नाही का?
  • काँग्रेस देशाच्या लोकशाहीचा कधीच विचार करत नाही
  • भाजप, संघाच्या नावानं लोकांना घाबरवलं जात आहे
  • मुस्लिम, दलित संकटात असल्याचं भासवलं जात आहे
  • लोकसभा निवडणुकीत ४०० वरून ४० वर आले
  • तेव्हा, निवडणुकीत गडबड झाल्याचा साक्षात्कार
  • ईव्हीएम मशिनवरून टीकेची झोड


मुख्यमंत्र्यांनी केले आरोप

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. काँग्रेस संविधानाबाबत बोलत असंल तरी संविधानाला सर्वात मोठा धोका हा काँग्रेसपासूनच आहे. काँग्रेसने लोकशाहीला बुडवण्याचं काम केलं आहे. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. मात्र त्यांचा हा निर्णय लोकशाहीला मारक होता, असं आरोप यावेळी त्यांनी केला.  

'काँग्रेसने आणीबाणी लादत लोकशाहीचा स्तंभ मानला जाणाऱ्या माध्यमांचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या आणीबाणीविरोधात ज्यांनी आवाज उठवला त्या सगळ्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आता लोकशाही जपण्यासाठी काँग्रेसचे नेते आवाज उठवतात मग त्या काळी जेव्हा अन्याय झाला होता तेव्हा कुठे गेली होती लोकशाही?, असा सवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.



हेही वाचा-

शहिदांच्या पत्नीला मिळणार शासकीय जमीन

'पंतप्रधानांमुळे संविधान धोक्यात', शरद पवारांचं टीकास्त्र



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा