पंतप्रधान मोदींचा आणीबाणी, लोकशाहीवर संवाद


SHARE

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकच्या वार्षिक बैठकीलाही ते हजेरी लावतील. त्यानंतर भाजपाने आणीबाणीविरोधी दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते लोकशाहीवर संवाद साधतील.


काय बोलतील मोदी?

तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ साली देशात आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी भाजपने बिर्ला मातोश्री सभागृहात संवाद सभेचं आयोजन केलं. यावेळी मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधान राजभवनात उद्योगपतींशी चर्चा करतील.


हेही वाचा -

आणीबाणीत तुरूंगवास भोगणाऱ्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

संबंधित विषय
ताज्या बातम्या