Advertisement

'पंतप्रधानांमुळे संविधान धोक्यात', शरद पवारांचं टीकास्त्र


'पंतप्रधानांमुळे संविधान धोक्यात', शरद पवारांचं टीकास्त्र
SHARES

महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान धोक्यात आल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

यावेळी त्यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचं आवाहन विरोधी पक्षांना केलं. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.


'निर्दोष लोकांची हत्या'

गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीला मोदी पूर्णपणे जबाबदार नसले तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यात कोणतंही महत्त्वाचं पाऊल उचललं नाही. शिवाय गोध्रा हत्याकांड झालं त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र त्यावेळी दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही पवार यांनी केला.

'दंगलीदरम्यान माझे सहकारी आणि माजी खासदार एहसान जाफरी देखील मारले गेले. मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र आता ते देशाचं नेतृत्व करत आहेत. मात्र आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे,' असंही यावेळी पवार म्हणाले.


'मोदींनाही जनता धडा शिकवेल'

संविधानाबाबत भाजप कितीही चांगलं वक्तव्य करत असलं तरी ती साफ खोटी असल्याची टीका यावेळी पवारांनी केली. इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काही केलं, पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याच नागरिकांनी इंदिरा गांधींसारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला. आता मोदीही तेच करण्याच्या प्रयत्नात असल्याने मोदींनाही जनता धडा शिकवेल, असंही पवार म्हणाले.


हेही वाचा - 

१९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही- शरद पवार

टोपी न घालणारे देताहेत इफ्तार पार्टी- शरद पवार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा