राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं! 'हा' आहे त्याच्या नावाचा अर्थ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सून मिताली बोरुडे (Mitali Borude) यांच्या मुलाचं आज बारसं झालं. या चिमुकल्याचं नावं 'किआन' (Kiaan) असं ठेवण्यात आलं आहे.

नामकरण सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. ५ एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं होत. नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती खुद्द अमित ठाकरे यांनी फेसबुकवर फोटो ट्विट करत दिली होती.

राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या पुत्राचं नाव 'किआन' असं ठेवण्यात आलं आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God), प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे.

चिमुकल्याचा आगमनापासूनच राज ठाकरे यांच्या घरी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. चिमुकल्याच्या आगमनानंतर बाळाचे आजोबा राज ठाकरे आणि त्याच्या पत्नी म्हणजे बाळाच्या आजी शर्मिला यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, 'आजी-आजोबा होण्यासारखं दुसरं कोणतंही सुख नाही.'

अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.

२०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात अमित आणि मिताली यांचा साखरपुडा पार पडला होता. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. मिताली यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन आहेत.

राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर दोघंही विवाहबंधनात अडकले होते.


हेही वाचा

'राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही', भाजप खासदाराचा इशारा

यशवंत किल्लेदारांचे पोलिसांना पत्र, माहिमच्या मशिदिंविरोधात तक्रार

पुढील बातमी
इतर बातम्या