Advertisement

यशवंत किल्लेदारांचे पोलिसांना पत्र, माहिमच्या मशिदिंविरोधात तक्रार

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबई पोलिसांना पत्र पाठवलं आहे.

यशवंत किल्लेदारांचे पोलिसांना पत्र, माहिमच्या मशिदिंविरोधात तक्रार
SHARES

मनसे नेते यशवंत किल्लेदार (MNS leader Yashwant Killedar) यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पत्र पाठवलं आहे.

माहीम (Mahim) विभागातील मशिदींवर संध्याकाळच्यावेळी भोंगे लावून अजाण पठण केलं जात आहे, अशा तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत. कायद्यानुसार या मशिदींवर कारवाई करावी, अशी मागणी किल्लेदार यांनी केली आहे. मनसेकडून याबाबतचं पत्र माहीम पोलीस ठाण्याला देण्यात आलंय.

पत्रात म्हटलं आहे की, ४ मे रोजी सकाळी लाऊड स्पिकरवर अजाण झाली नाही. पण संध्याकाळी स्पिकरचा वापर झाला. पुन्हा न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली केली जात आहे. याप्रकरणी काटेकोर अंमलबजावणी व्हावी.

आम्ही काकड आरती बंद करायला सांगितलं नाही. भोंग्यावरची अजाण बंद करा असे सांगितले आहे. हा मूळ विषय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, जो राज ठाकरे यांनी पुन्हा काढला. कारण त्यावर आदेश असतानाही कुणी त्याचे पालन करत नाहीय. आज सबंध देशात लोक हा विषय उचलून धरत आहे. लोक धन्यवाद देत आहेत, असं शालिनी ठाकरे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी गुरुवारी सांगितले की, या आंदोलनामुळे हिंदूंचे अधिक नुकसान होईल कारण २, ४०४ मंदिरे लाऊडस्पीकर वापरू शकणार नाहीत.

"सकाळची अजान मुस्लिमांनी बंद केली आहे. पण यासोबतच अनेक धार्मिक स्थळांमध्ये होणारी काकड आरतीही बंद केली आहे. मनसेमुळे हिंदूंना जास्त त्रास झाला आहे," असं सावंत म्हणाले.

"मुंबईत एकूण २, ४०४ मंदिरे आणि १, १४४ मशिदी आहेत. कालपर्यंत यापैकी फक्त २० मंदिरे आणि ९२२ मशिदींनाच परवानग्या आहेत. ५ मंदिरे आणि १५ मशिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचे म्हणणे ऐकून घेतले तर मशिदींसह २,४०० मंदिरांना परवानगी मिळणार नाही," असं ते पुढे म्हणाले.हेही वाचा

मस्जिदवर आहेत भोंगे, तुम्ही का करताय सोंगे - रामदास आठवले

‘मर्सिडीज बेबी’ला संघर्ष काय कळणार? आदित्य ठाकरेंना फडणवीसांचा टोला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा