Advertisement

‘मर्सिडीज बेबी’ला संघर्ष काय कळणार? आदित्य ठाकरेंना फडणवीसांचा टोला

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवणारं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

‘मर्सिडीज बेबी’ला संघर्ष काय कळणार? आदित्य ठाकरेंना फडणवीसांचा टोला
SHARES

विधानसभा विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी घेतलेल्या बुस्टर सभेमध्ये बाबरी पाडली तेव्हा आपण तिथे होतो पण एकही शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असं म्हटलं होतं. यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवणारं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस १८५७ च्या उठावातही सहभागी होते अशी टीका केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी आहेत त्यांना ना संघर्ष करावा लागला आहे, ना पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते करू शकतात, पण कितीही खिल्ली उडवली तेव्हा तिथे होतो याचा आम्हाला गर्व आहे”.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी हिंदू असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्म असेल तर कदाचित १८५७ च्या युद्धात मी तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत लढत असेन. आणि तुम्ही असाल तर त्यावेळीही तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता ज्यांच्याशी तुम्ही युती केली आहे ते १८५७ ला युद्धच मानत नाहीत. ते शिपायांचं बंड होत असं ते मानतात”.

देवेंद्र फडणवीसांनी आपण बाबरी पाडली तेव्हा अयोध्येमध्ये होतो असा दावा केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असताना आदित्य ठाकरेंनी, “१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल,” अशी मोजक्या शब्दांमध्ये खोचक प्रतिक्रिया नोंदवली.



हेही वाचा

आम्ही चूल पेटवण्यासाठी काम करतो, तर ते घर पेटवण्यासाठी - आदित्य ठाकरे

"आमच्या पुतण्याच्या डोक्यात काय शिरलं माहीत नाही", बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ व्हायरल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा