Advertisement

"आमच्या पुतण्याच्या डोक्यात काय शिरलं माहीत नाही", बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ व्हायरल

शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत.

"आमच्या पुतण्याच्या डोक्यात काय शिरलं माहीत नाही", बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ व्हायरल
SHARES

मनसेनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर हल्ला चढवला होता. भोंग्याविषयीची शिवसेनाप्रमुखांची भूमिका सांगणारा हा व्हिडीओ होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत.

व्हिडिओत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, या आमच्या पुतण्याने XX मारली. काय त्याच्या डोक्यात शिरलं माहीत नाही. नेतृत्व हे जे आहे ना (सभेतील गर्दीकडे बोट दाखवत), जे दिसतं ना ते पाहिजे. मैदान कसं भरलं होतं. एवढं झालं होतं का? हा फोटो माध्यमात नाही येणार. आमचाच येणार. हे दाखवा. हे दृश्य हे शिवस्वरूप. हे शिवाचं रुप आहे.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वापासून, त्यांच्या भाषणाच्या स्टाईलवर आणि मनसेची स्थापना झाल्यानंतर त्यांनी उचललेला मराठीचा मुद्दा यासर्वांवरच शिवसेनाप्रमुख टीका करताना दिसत आहेत.

व्हिडिओत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब बोलत आहेत की, मी पूर्वी ज्या स्टाईलमध्ये बोलत होतो. अशी ही स्टाईल माझी कोणी तरी उचलली म्हणतात. मला माहीत नाही. कोणीतरी. म्हणजे मी माझ्या स्टाईलमध्ये बोललो तर मी त्यांची कॉपी करेल असं म्हणाल. एक विनोद आठवतो. परीक्षा चालू असताना एका मुलाने कोरा पेपर दिला. सोडवलाच नाही. कोरा पेपर. दुसऱ्या विद्यार्थ्याने तक्रार केली. सर सर…बघा त्याने कोरा कागद दिला. दिला… तुला काय झालं? नाही… तुम्ही माझ्यावर आरोप कराल. तुम्ही त्याची कॉपी केली म्हणून. स्टाईल वगैरे ठिक आहे हो… विचार… विचार महत्त्वाचे आहेत. काही वाचन वगैरे आहे का तुमचं अं… मराठी मराठी मराठी… अरे XXनो तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हा मी मराठी काढलीय या महाराष्ट्रामध्ये. ही साक्ष आहे त्याची. जाऊ द्या. खरं सांगायचं म्हणजे खूपच मुद्दे आहेत, असं बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी बाळासाहेबांचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे म्हणाले आहेत की, ज्या दिवशी या महाराष्ट्रात माझं सरकार येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल तर त्याने येऊन आम्हाला सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील, बंद.



हेही वाचा

राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ ट्विट

पुन्हा भोंग्यावर अजान वाजली तर... राज ठाकरेंचा इशारा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा