Advertisement

पुन्हा भोंग्यावर अजान वाजली तर... राज ठाकरेंचा इशारा

मनसेतर्फे भोंग्यांविरोधात करण्यात आलेले आंदोलन आजच्या पुरते मर्यादित नव्हते, असं म्हणत राज ठाकरेंनी पुढची दिशा स्पष्ट केली.

पुन्हा भोंग्यावर अजान वाजली तर... राज ठाकरेंचा इशारा
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भोंग्याविरोधातील आंदोलन सुरूच राहणार असं स्पष्ट केलं आहे. यासोबतच त्यांनी ठणकावलं की, हा एक दिवसाचा विषय नाही. जोपर्यंत भोंग्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. यासोबतच भोंगे न लावणाऱ्या मौलविंचे राज ठाकरे यांनी आभार मानले.  

ते म्हणाले की, आज सकाळपासून महाराष्ट्राच्या विविध भागातून मला फोन येत आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरुनही अनेक ठिकाणांहून फोन येत आहेत, माहिती मिळत आहेत. पोलिसांचे फोन येत आहेत, काही गोष्टी सांगत आहेत, सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, मनसैनिकांना पोलिस नोटीस पाठवत आहेत, पकडत आहेत, ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट आमच्याबाबतच का होत आहे? हा आमचा प्रश्न आहे. जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना सजा देणार, ताब्यात घेणार आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक देणार?

ते पुढे म्हणाले की, जवळपास ९०-९२ ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन, आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला. मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत ११४० मशिदी आहेत. त्यापैकी १३५ मशिदींमध्ये सकाळची अजान ५ च्या आत वाजवली गेली. काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलंं. आता ज्या १३५ मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? की आमच्याच पोरांना उचलणार?

केवळ मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न आहे असं नाही, मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा

संदीप देशपांडे, संतोष धुरींची पोलिसांच्या हातावर तुरी, महिला पोलीस जखमी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा