Advertisement

संदीप देशपांडे, संतोष धुरींची पोलिसांच्या हातावर तुरी, महिला पोलीस जखमी

दोघांनी पोलिसांना तुरी देऊन तिथून पळ काढला. या सर्व झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाली आहे.

संदीप देशपांडे, संतोष धुरींची पोलिसांच्या हातावर तुरी, महिला पोलीस जखमी
SHARES

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यात येणार होते. परंतु दोघांनी पोलिसांना तुरी देऊन तिथून पळ काढला. या सर्व झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं.

संदीप देशपांडे आणि धुरी पोलिसांसोबत जाण्यास तयार झाले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगानं निघून गेली. या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाली.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणी वाढण्याच्या दाट शक्यता आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे. महिला पोलीस जखमी झाल्यानं त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.हेही वाचा

'त्यांनी' आम्हाला बाळासाहेब समजावू नये, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ ट्विट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा