Advertisement

'त्यांनी' आम्हाला बाळासाहेब समजावू नये, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

बाळासाहेब ठाकरे यांचे प्राचीन ट्वीट जरी टाकले तरी त्यांनी आम्हाला बाळासाहेब समजावू नये., असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

'त्यांनी' आम्हाला बाळासाहेब समजावू नये, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
(File Image)
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची एक क्लिप ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यावर संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे प्राचीन ट्वीट जरी टाकले तरी त्यांनी आम्हाला बाळासाहेब समजावू नये. आजही आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारांनी चालतो असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसेला सुनावले आहे.

संजय राऊत म्हणाले की, राज्यात शांतता असून कोणतेही आंदोलन झाले नाही. बाळासाहेबांनी भोंगे, नमाज याबाबत भूमिका घेतली, सत्ता आल्यावर नमाज त्यांनी बंद केले. बाळासाहेबांनी रस्त्यावरील नमाजावर तोडगा काढला आणि त्यानंतर रस्त्यावरील नमाज बंद झाले. भोंगे बाबत देखील सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि भोंगे बंद झाले असल्याचे त्यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाच्या जुन्या कॅसेट पाठवतो त्यांनी बाळासाहेब समजवून घ्यावे.

संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबात उपवस्त्र म्हणून राहत आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये.

संजय राऊत पुढे म्हणाले की, हाच नियम मंदिर, चर्च सर्वांना आहे. समान नागरी कायदा असावा अशी मागणी असेल तर प्रत्येकाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काम करावे असेही त्यांनी म्हटले.

आंदोलन फक्त प्रसिद्धीसाठी आणि चिथावणीसाठी नसतात. शिवसेना गेली ५० वर्षे आंदोलन करत आहे. काही लोक राजकारणात हवशे नवशे गवशे असतात, त्यांच्यासाठी हे ठीक असल्याचा टोला राऊत यांनी मनसेला लगावला.



हेही वाचा

राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ ट्विट

पनवेलमध्ये भोंग्यांशिवाय झाली पहाटेची अजान, मनसेने मानले आभार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा