Advertisement

पनवेलमध्ये भोंग्यांशिवाय झाली पहाटेची अजान, मनसेने मानले आभार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमचा परिणाम पनवेलमध्ये पहायला मिळाला.

पनवेलमध्ये भोंग्यांशिवाय झाली पहाटेची अजान, मनसेने मानले आभार
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमचा परिणाम पनवेलमध्ये पहायला मिळाला. मनसेचे पहिले पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी मशिदीमधून बांग देण्यात आली नसल्याचा दावा केला आहे.

योगेश चिले म्हणाले की, आज पनवेलमध्ये पहाटे ४ वाजून ५० मिनिटांची आणि ६ वाजून ८ मिनिटांची एजान भोंग्यावरून झाली नाही. या पुढे देखील अशीच अजान भोंग्यावरून न देता तोंडी द्यावी. जर या पुढे भोंग्यावरून अजान दिली गेली तर हनुमान चालिसा सुद्धा भोंग्यावरूनच ऐकावी लागेल.  

राज ठाकरेंच्या आवाहनाला पनवेलमधील मुस्लिम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मनसेकडून मुस्लिम बांधवांचे आभार देखील योगेश चिले यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सकाळी मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.

मुंबईतील अनेक भागात मशिदींसमोर मनसेनं हनुमान चालिसाचे पठण केले. चारकोप, चांदिवली, मुंबादेवी, ठाणे आदी भागात मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी हनुमान चालीसा वाजवली. पोलिस अनेक ठिकाणाहून मनसे कार्यकर्त्यांना अटक करत आहेत.

बुधवार सकाळी झालेल्या अजानच्या निषेधार्थ ठाण्यात लाऊडस्पीकरवर मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचं पठण केलं. ठाण्यातील इंदिरा नगर इथल्या मशिदीत पहाटे ५.१४ वाजता अजान झाली. याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्ता पप्पू कदम यांनी त्याच मशिदीजवळील इंदिरा डोंगरा येथील महालक्ष्मी मंदिरात हनुमान चालीसाचा पाठ सुरू केला.

राज यांनी मंगळवारी सायंकाळी जारी केलेल्या पत्रकामध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते. त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी, असं म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे, रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.



हेही वाचा

राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ ट्विट

मनसे कार्यकर्ते आक्रमक, भोंगे लावत हनुमान चालिसाचं पठन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा