Advertisement

राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ ट्विट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे.

राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ ट्विट
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं.

या सर्व घडामोडित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे मशिदींवरील भोंग्यांबाबात ठाम भूमिका घेताना दिसत आहेत.

व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे म्हणाले आहेत की, ज्या दिवशी या महाराष्ट्रात माझं सरकार येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल तर त्याने येऊन आम्हाला सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील, बंद.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आज एक पत्रक काढून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आवाहन केलंय. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मशिदींवरील भूमिकेची आठवण करून दिली. तसंच राज यांनी पत्रकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केलीय.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असं आव्हान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना मंगळवारी दिलं होतं.

त्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा जुन्हा व्हिडिओ ट्विट केला आहे.



हेही वाचा

मनसे कार्यकर्ते आक्रमक, भोंगे लावत हनुमान चालिसाचं पठन

राज ठाकरेंची भोंग्याविरोधातील भूमिका ठाम, लोकांना केलं 'हे' आवाहन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा