Advertisement

राज ठाकरेंची भोंग्याविरोधातील भूमिका ठाम, लोकांना केलं 'हे' आवाहन

नुकतंच ट्विट करत त्यांनी यासंदर्भात मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

राज ठाकरेंची भोंग्याविरोधातील भूमिका ठाम, लोकांना केलं 'हे' आवाहन
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधातील त्यांची भूमिका ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. नुकतंच ट्विट करत त्यांनी यासंदर्भात मनसे कार्यकर्त्यांना  महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. 

राज ठाकरे म्हणाले की, तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे बांग देतील तिथे तिथे आपण हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा काय वास होतो ते त्यांना समजले. 

राज ठाकरे यांनी यावेळी हिंदू नागरिकांना तीन गोष्टी आवर्जून करण्याचे आवाहन केलं आहे. यामध्ये हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवर लावण्याचे आवाहन केले. त्याशिवाय सबंधित मशिदीवर असलेल्या लाऊडस्पीकर विरोधात स्थानिक मंडळ आणि नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्थानिक पोलीस ठाण्यात दररोज तक्रारींचे निवेदन द्यावे अशी सूचनाही राज यांनी केली. 

तिसऱ्या आवाहनात राज यांनी मशिदीच्या लाऊडस्पीकर करून बांग सुरू झाल्यावर पोलिसांच्या 100 क्रमांकावर दूरध्वनी करून आवाजाची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा