Advertisement

मस्जिदवर आहेत भोंगे, तुम्ही का करताय सोंगे - रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.

मस्जिदवर आहेत भोंगे, तुम्ही का करताय सोंगे - रामदास आठवले
SHARES

भोंगे काढण्याची भूमिका ही असंवैधानिक आहे. मस्जिदवर आहेत भोंगे, तुम्ही का करताय सोंगे असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.

मस्जिदवरील भोंग्याचा आवाज कमी करता येऊ शकतो, मात्र काढून टाका म्हणणे चुकीचे आहे. नवरात्रीला देखील आवाज असतो, बुद्ध पौर्णिमा देखील उत्साहात साजरी होते, पण मुस्लिमांनी कधी विरोध केला नसल्याचे आठवले यावेळी म्हणाले.

तसंच ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी राज ठाकरे कधी करू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे हे वेगळं नेतृत्व होतं. त्यांनी भोंगे काढा असे कधी म्हटलं नसल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम विरोधी नव्हते, त्यांचा मुस्लिम समाजाला पाठिंबा होता. आंतकवादी मुस्लिमांच्या विरोधात ते होते असेही आठवले यावेळी म्हणाले.

मी मनसे सांगतो की आम्हाला मनसेची अवशक्यता नाही. नरेंद्र मोदी यांची स्वतःची प्रतिमा आहे. चुकीच्या भूमिका मांडणाऱ्या लोकांची आवश्यकता नाही. भाजप त्यांना घेणार देखील नाही, भाजप स्वतः सक्षम असल्याचे आठवले म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवण्यास विरोध केला आहे. मशिदीतील लाऊडस्पीकर काढून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता कामा नये, असं ते म्हणाले. एवढेच नाही तर मशिदीतील लाऊडस्पीकर काढायला कोणी आलं, तर आपला पक्ष मशिदीचे रक्षण करेल आणि लाऊडस्पीकर हटवण्यासही विरोध करेल, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, मी नरेंद्र मोदींसोबत आहे, माझा पक्ष भाजपसोबत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. मी म्हणालो लाऊडस्पीकर काढण्याबद्दल बोलू नका. जर तुम्हाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, तर तुम्ही लावू शकता. तुम्ही तुमच्या मंदिरात लाऊडस्पीकर लावू शकता. हनुमान चालिसाचे पठण करू शकता. पण नवे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका.



हेही वाचा

‘मर्सिडीज बेबी’ला संघर्ष काय कळणार? आदित्य ठाकरेंना फडणवीसांचा टोला

"आमच्या पुतण्याच्या डोक्यात काय शिरलं माहीत नाही", बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ व्हायरल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा