ही तर अॅक्शनवर, रिअॅक्शन- अबू आझमी

अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केलेलं असल्याने या बांधकामावर कारवाई अपेक्षितच होती. महाराष्ट्रात येऊन काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही. कंगनाच्या अॅक्शनवरचीच ही रिअॅक्शन आहे. तिने शांत पाण्यात दगड मारला, तर तरंग उठणारच, असं म्हणत समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी देखील कंगनाला टोला हाणला आहे. (samajwadi party mla abu azmi reacts on actress kangana ranaut tussle with bmc)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अबू आझमी म्हणाले की, जी लोकं महाराष्ट्रात येऊन रोजीरोटी कमावतात आणि महाराष्ट्राबद्दल चुकीचं बोलतात त्यांना या राज्याच्या जमिनीवर पाय ठेवण्याचाही अधिकार नाही. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. कंगनाला महाराष्ट्रातील सरकारवर, मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल, तर तिने पुन्हा हिमाचल प्रदेशला निघून जावं. 

हेही वाचा - आज माझं घर तुटलं, उद्या तुमचा अहंकार मोडेल, कंगनाचा उद्धव ठाकरेंवर संताप

तिने चित्रपटसृष्टीत देखील भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूडमध्ये इस्लामिक डॉमिनेशन आहे, असं ती म्हणते. सिनेसृष्टीतील मुस्लिमांची मक्तेदारी मोडीत काढल्याचा दावा तिने केला. अशा पद्धतीने सांप्रदायिकता निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर निश्चितच कारवाई व्हायला पाहिजे. या देशात धार्मिक तेढ, द्वेष पसरवणाऱ्या तसंच भाजपच्या हिताचं बोलणाऱ्या लोकांनाच भाजपकडून संरक्षण देण्यात येतं. कंगना रणौत सध्या भाजप आणि आरएसएसचीच भाषा बोलत आहे, असा आरोप अबू आझमी यांनी केला.

महापालिकेने तिच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबद्दल बोलताना अबू आझमी म्हणाले, कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्यावरच महापालिकेने कारवाई केली आहे. मुंबईत अनेक अनधिकृत इमारती आहेत. ज्याची ज्याची तक्रार केली जाते, त्यावर कारवाई होतेच. त्यामुळे यांत चुकीचं काहीही नसून ही सुडाची कारवाई देखील नाही. केवळ महिला असल्यामुळे काहीही बोलण्याचा कंगनाला अधिकार नाही. शांत पाण्यात दगड मारल्यावर तरंग उठरणारच.  

हेही वाचा - कोरोनाचं अपयश झाकण्यासाठीच कंगनावर कारवाई, भाजपची टीका

पुढील बातमी
इतर बातम्या