Advertisement

आज माझं घर तुटलं, उद्या तुमचा अहंकार मोडेल, कंगनाचा उद्धव ठाकरेंवर संताप

उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचा अहंकार तुटेल, अशा शब्दांत कंगनाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

आज माझं घर तुटलं, उद्या तुमचा अहंकार मोडेल, कंगनाचा उद्धव ठाकरेंवर संताप
SHARES

मुंबईमधील घरी पोहोचताच अभिनेत्री कंगना रणौतने एक व्हिडिओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचा अहंकार तुटेल, अशा शब्दांत कंगनाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. (bollywood actress kangana ranaut angry on maharashtra cm uddhav thackeray )

कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामांची महापालिकेनं बुधवारी तोडफोड केली. महापालिकेची ही कारवाई सकाळी ११ वाजता सुरू झाली आणि २ तास चालली. मात्र, कंगनाच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेच्या या कारवाईविरोधात अर्ज दाखल केल्यानंतर महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. अद्याप त्यावर सुनावणी बाकी आहे.

यापूर्वी, मंगळवारी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयाबाहेर नोटीस लावली होती. या नोटिशीत अनधिकृत बांधकामाबाबत जाब विचारला होता. पण कंगनाकडून उत्तर न आल्याने महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई सुरू केली. 

याच दरम्यान कंगना मुंबईतील आपल्या घरी परतली. त्यानंतर तिने एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही फिल्म माफियाशी हातमिळवणी करून माझं घर तोडत बदला घेतला? आज माझं घर तोडलं, उद्या तुमचा अहंकार मोडेल. हे वेळेचं चक्र आहे, लक्षात ठेवा. असं एकेरी शब्दांत संताप व्यक्त केला.

हेही वाचा - पालिकेच्या कारवाईनंतर कंगना पुन्हा बरळली, मुंबईला म्हणाली पाकिस्तान

कंगनानं एक ट्विट करत दावा केला की, माझ्या कार्यालयात कुठलही अनधिकृक बांधकाम झालं नाही. पण यावर उत्तर देत महापालिकेनं एक यादी जाहीर केली आहे. या यादीत कंगनाच्या कार्यालयातील बांधकाम कसं बेकायदेशीर आहे, याचं वर्णन केलं आहे.

  • कंगनाच्या ऑफिस 'मणिकर्णिका' च्या तळ मजल्यावरील टॉयलेटला ऑफिस केबिन बनवण्यात आलं आहे.
  • मणिकर्णिकाच्या स्टोअर रूमला किचनचं रूप देण्यात आलं आहे.
  • स्टोअरमध्ये आणि पार्किंगच्या ठिकाणी पायर्‍याजवळ नवीन शौचालयं बांधली जात आहेत.
  • तळ मजल्यावर पॅन्ट्री तयार केली जात आहे.
  • पहिल्या मजल्यावर, लिव्हिंग रूममध्ये लाकडी विभाजन टाकून एक केबिन बनवलं गेलं आहे.
  • पहिल्या मजल्यावरील पूजा कक्षात एक केबिनचं विभाजन केलं गेलं आहे.
  • पहिल्या मजल्यावरील खुल्या चौकात शौचालय बांधलं गेलं आहे.
  • दुसर्‍या मजल्यावरील पायऱ्या बदलल्या आहेत.
  • पहिल्या मजल्यावर बेकायदेशीरपणे स्लॅब बनवला गेला आहे.
  • दुसर्‍या मजल्यावरील भिंत तोडून एक बाल्कनी तयार केली आहे.

या कारवाईसंदर्भात महापालिकेनं सांगितलं की, कंगनाला नोटीस मिळाल्यानंतरही सदर काम चालू ठेवण्यात आलं. म्हणूनच सूचनेनुसार या अनधिकृत बांधकाम त्वरीत पाडण्यात आलं. यासाठी स्वत: तुम्ही जबाबदार आहात. महापालिकेनं कंगनाला तिच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामांबाबत चार नोटीस बजावल्या होत्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा