शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत

शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना अधिकृत पत्र देऊन याबाबत कळवलं आहे. त्यानुसार संजय राऊत राज्यसभा आणि लोकसभेत शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते असणार आहेत.

समन्वय साधण्यासाठी

काही महिन्यांपूर्वी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या वेळेस शिवसेनेने जारी केलेल्या 'व्हिप'वरून घोळ झाला होता. त्यानंतर दोन्ही सभागृहातील खासदारांमध्ये समन्वय साधावा यादृष्टीने पक्षानं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

पळवापळवी थांबवण्यासाठी

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारं पळवापळवीचं राजकरण मोडून काढण्यासाठी राऊत यांची यांची या पदासाठी निवड करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे राऊत यांना दोन्ही सभागृहाच्या नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्यासोबतच त्यांच्या हालचालींवर बारीक नजरही ठेवावी लागणार आहे.

काय आहे पत्रात?

यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेच्या स्वतंत्र संसदीय पक्षाचे नेते वेगवेगळे होते. संजय राऊत राज्यसभेतील पक्षाच्या तीन सदस्यीय दलाचे नेते, तर आनंदराव अडसूळ लोकसभेतील शिवसेनेच्या १८ सदस्यीय पक्षाचे नेते होते.

परंतु आता राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेच्या सचिवालयाला विनंती आहे की, इथून पुढे होणारा पत्रव्यवहार त्यांच्याच नावे करण्यात यावा. उद्धव ठाकरे यांनी हे पत्र २९ आॅगस्ट रोजी लिहिलं आहे.


हेही वाचा-

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरूपम की देवरा? निर्णय घेणार राहुल गांधी!

'राम कदम नरमले, महिलांचा सन्मान करू म्हणाले...'


पुढील बातमी
इतर बातम्या