Advertisement

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरूपम की देवरा? निर्णय घेणार राहुल गांधी!

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत असताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेऊन मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची मागणी केली. त्यावर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी निर्णय घेणार आहेत.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरूपम की देवरा? निर्णय घेणार राहुल गांधी!
SHARES

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची रश्शीखेच चांगलीच जोर पकडू लागली आहे. एका बाजूला जिथं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन मिलिंद देवरा यांना अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची विनंती केली; तिथंच दुसऱ्या बाजूला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दबावतंत्राची चाल खेळली आहे. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते खर्गे यांच्या अहवालावर. कारण ते जे अहवाल सादर करतील, त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत.


तीन गट कार्यरत

मुंबई काँग्रेसची खुर्ची पटकावण्यासाठी सध्या तीन गट सक्रीय झाले आहेत. त्यातील पहिला गट आहे तो सध्याचे अध्यक्ष संजय निरूपम यांचा. दुसरा गट आहे तो मिलिंद देवरा यांचा आणि तिसरा गट आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत नेते गुरूदास कामत यांच्या सहकाऱ्यांचा.


चर्चेला उत

मुंबईतील बहुतेक ज्येष्ठ नेत्यांनी १६ सप्टेंबर रोजी शहरात भेटीगाठीसाठी दाखल झालेले खर्गे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे देवरा यांना अध्यक्षपद देण्याची मागणी केल्याचं कळत आहे. तर दुसऱ्या बाजूला निवेदन देण्याच्या निमित्ताने निरूपम यांनी सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत वेळ आल्यास आपण काय पाऊल उचलू शकतो, याचे संकेत काँग्रेसला दिले. यामुळे काँग्रेसच्या गोटात चर्चेला चांगलाच उत आला आहे.


अहवाल लवकरच

मुंबई काँग्रेसमधील या गटबाजीचं प्रकरण आता राहुल गांधी यांच्या दरवाज्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. खर्गे आपला अहवाल राहुल यांना सुपूर्द करणार आहेत. त्यावर राहुल यांना अंतिम निर्णय घ्यायचा आहे. या निर्णयावरच निरूपम यांचं अध्यक्षपद राहणार की जाणार हे ठरणार आहे.



हेही वाचा-

'राम कदम नरमले, महिलांचा सन्मान करू म्हणाले...'

राजकीय बॅनरबाजीला चाप अशक्य, निवडणूक आयोगाची हतबलता



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा