२६ जानेवारीपासून मिळणार शिवभोजन थाळी

येत्या २६ जानेवारीपासून राज्यभरातील गरीब आणि गरजूंना अवघ्या १० रुपयांत शिवभाेजन थाळी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवभाेजन योजनेचा आढावा घेतल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले.

हेही वाचा- अटी बघूनच भूक मरेल, शिवभोजन योजनेवर नीलेश राणेंची टीका

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवभोजन योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणाऱ्या शिवभोजन योजनेला मान्यता देऊन ३ महिन्यांकरीता ६ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्यानुसार राज्यभरात विविध ठिकाणी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान ही थाळी सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे. या थाळीत फक्त २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी डाळ आणि भात मिळणार आहे. 

  • जेवण दुपारी १२ ते २ याच कालावधीत उपलब्ध असेल.

  • प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला जास्तीत जास्त १५०० जणांनाच जेवण मिळेल

  • जेवणात ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम वरण व दीडशे ग्रॅम भात मिळेल.

  • शिवभोजनालय चालवण्यासाठी संबंधिताकडं स्वत:ची पुरेशी जागा असावी.

  • भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल

हेही वाचा- जाचक अटींच्या पल्याड शिवभोजनाची ताटी

पुढील बातमी
इतर बातम्या