मनोमिलनानंतरही उद्धव, फडणवीस करणार वेगवेगळा प्रचार

लोकसभा निवडणुक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून राज्यभरात प्रचाराला सुरुवात झाली आहे. यामध्ये युती आघाडीच्या सभांनी जोर धरल्याचं चित्र दिसतं आहे. परंतू, प्रचारात महाआघाडीपेक्षा युती आघाडीवर असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपाच्या एकत्रित सभा होणार नसून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळवेगळा प्रचार करणार असल्याचं समजतं आहे.

जास्तीत जास्त ठिकाणी

लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता येईल. त्याशिवाय कार्यकर्त्यांचंही मनोमिलन करता येईल. या उद्धीष्टानं उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करणार आहेत.

मोदींच्या महाराष्ट्रात ८ प्रचारसभा

दरम्यान, यंदा लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात ८ प्रचारसभा होणार आहेत. नरेंद्र मोदी यांची पहिली सभा १ एप्रिल रोजी वर्धा येथे होणार आहे. त्यानंतर आणखी एक सभा विदर्भात होणार असल्याचं समजतं आहे. त्याशिवाय, नरेंद्र मोदींची शेवटची सभा मुंबईत होणार असून, या सभेत मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्रित व्यासपीठावर येणार आहेत.


हेही वाचा -

'मिशन शक्ती' हे वैज्ञानिकांचं कर्तृत्व, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या - राज ठाकरे

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत


पुढील बातमी
इतर बातम्या