Advertisement

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

वसई रोड स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

वसई रोड स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळं चर्चगेटहून विरारच्या दिशेनं जाणारी आणि विरारहून चर्चगेटच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिरानं सुरू आहे. महत्वाचं स्थानक

वसई रोड हे पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांपैकी एक स्थानक असून नेहमीच स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळं गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून बिघाडाच्या दुरूस्तीचे काम तातडीनं हाती घेतलं आहे.हेही वाचा -

'मिशन शक्ती' हे वैज्ञानिकांचं कर्तृत्व, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या - राज ठाकरे

रेल्वे स्थानकावरून शीतपेय हद्दपार होणारसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा