Advertisement

'मिशन शक्ती' हे वैज्ञानिकांचं कर्तृत्व, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या - राज ठाकरे

भारतानं ३ मिनिटात सॅटेलाईटचा वेध घेणारं 'ए-सॅट' हे क्षेपणास्त्र बुधवारी लॉन्च केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या कामगिरीची माहिती देशवासीयांनी दिली. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे

'मिशन शक्ती' हे वैज्ञानिकांचं कर्तृत्व, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या - राज ठाकरे
SHARES

भारतानं ३ मिनिटात सॅटेलाईटचा वेध घेणारं 'ए-सॅट' हे क्षेपणास्त्र बुधवारी लॉन्च केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या कामगिरीची माहिती देशवासीयांनी दिली. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. 'नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करुन याबाबतची माहिती देण्याची काय गरज, हे वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या', अशी टीका ट्विटवरून राज ठाकरे यांनी मोदींवर केली आहे. 


नरेंद्र मोदींवर टीका

'एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. त्याबद्दल वैज्ञानिकांचं नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज? वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या.त्यांना प्रसिद्धी मिळू द्या', अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 



भारत चौथा देश ठरला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करत भारतान उपग्रहविरोधी क्षेपणास्राच्या सहाय्यानं उपग्रह पाडला आहे. त्यामुळं क्षेपणास्राच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर भारत चौथा देश ठरला आहे, अशी माहिती दिली.



हेही वाचा -

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २ तास वाहतूक बंद

मालाड स्थानकातील उत्तरेकडील पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा