Advertisement

मालाड स्थानकातील उत्तरेकडील पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद

पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील उत्तर दिशेला असलेला महापालिकेचा पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे.

मालाड स्थानकातील उत्तरेकडील पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद
SHARES

काही दिवसांपुर्वी दादर स्थानकातील दक्षिण दिशेच्या पुलाची केली असता हा पूल धोकादायक असल्यामुळं प्रशासनानं या पुलाचा रॅम्प आणि स्थाकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वर उतरणारा जिना बंद केला. अशातच आता, पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकातील उत्तर दिशेला असलेला महापालिकेचा पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे. 


जीर्ण अवस्थेत पूल

मालाड स्थानकातील हा पूल जीर्ण अवस्थेत असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं २९ मार्च ते २८ जूनपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहेे. दरम्यान, या स्थानकात रेल्वे प्रशासनानं नवीन पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला केला आहे. 


४ पादचारी पुलांचा वापर 

दरम्यान, मालाड स्थानकातील एकूण ४ पादचारी पुलांचा प्रवाशांकडून वापर केला जात आहे. त्यामुळं स्थानकातील उत्तर दिशेकडील पूल बंद करण्यात येणार असल्यामुळं प्रवाशांनी रेल्वेच्या पादचारी पुलांवरून प्रवास करावा, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.



हेही वाचा -

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २ तास वाहतूक बंद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा