मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मार्गिका २ तासांसाठी बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कमान बसविण्यात येणार आहे. त्यामुळं या कामासाठी द्रृतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेनं येणारी एक मार्गिका दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

SHARE

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कमान बसविण्यात येणार आहे. त्यामुळं या कामासाठी द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेनं येणारी एक मार्गिका २ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.


पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेनं येणारी मार्गिका बंद असल्यानं प्रवाशांची गैर सोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. खालापूर टोल- खालापूर गाव- खालापूर फाटा-मार्गे चौक फाटा- दौंड फाटा- शेडूंग टोल, अजिवळी फाटा आणि त्यानंतर परत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ही वाहतूक वळवण्यात येणार आहे.


वाहतूककोंडी

पुण्याहून अनेक प्रवासी मुंबईला कामसाठी येत असतात. मात्र, पुणे-मुंबई ही मार्गिक २ तास बंद ठेवण्यात येणार असल्यानं प्रवाशांना वाहतूककोंडीला समोर जावं लागणार आहे

संबंधित विषय
ताज्या बातम्या