मुंबई ‘एपीएमसी’ महाविकास आघाडीच्या हाती, भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Mumbai apmc) निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीने (maha vikas aghadi) भाजपच्या (bjp) उमेदवारांना धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे. बाजार समितीच्या सर्व विभागांवर महाविकास आघाडीनं वर्चस्व राखलं असून भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. 

हेही वाचा-

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Mumbai apmc election result) निवडणुकीसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये खरी लढत होती. एकूण ३४ जिल्ह्यांमधून सुमारे ९.५७ टक्के मतदान केलं होतं. ६ महसूल विभागांमधून १२ शेतकरी व ४ व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी हे मतदान झालं. 

कांदा-बटाटा मार्केटमधून (potato onion market) राजेंद्र शेळके यांचा पराभव करत अशोक वाळुंज निवडून आले आहेत. भाजी मार्केटमधून (vegitable markat) शंकर पिंगळे यांनी के. डी. मोरे यांचा पराभव केला. मसाला मार्केटमधून (spice market) विजय भुता यांनी कीर्ती राणा यांना हरवलं. धान्य मार्केटमधून निलेश विरा जिंकून आले आहेत. कामगार मतदारसंघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केटमधून संजय पानसरे यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. अमरावती विभागातून काँग्रेसचे प्रवीण देशमुख व शिवसेनेचे माधव जाधव जिंकले आहेत. अन्य विभागांमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निर्विवाद आघाडी घेतली आहे.

हेही वाचा-

या निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं पॅनल (maha vikas aghadi) आधीच तयार करण्यात आलं होतं. तर महाविकास आघाडीविरोधात भाजपाने (bjp) उमेदवार उतरवले होते. या निवडणुकीत महसूल विभागात ९८.७२ टक्के, व्यापारी मतदारसंघात ८७.२१ टक्के मतदान झालं. त्याचबरोबर कोकणात सर्वाधिक ९९.६४ टक्के, अमरावतीत ९९ आणि पुण्यात ९९ टक्के इतकं मतदान झालं.

पुढील बातमी
इतर बातम्या