आम्ही हिंदुत्वाचं राजकारण करत नाही- संजय राऊत

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत सुनावलं आहे. आमच्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही आणि आम्ही हिंदुत्वाचं राजकारण देखील करत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनाप्रमुख (shiv sena) दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतीदिनामित्त राज्यातील सर्वच पक्षांतील प्रमुख नेत्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम! : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन.. अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना वंदन केलं. सोबतच शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका देखील केली आहे.

हेही वाचा- बाळासाहेबांना आदरांजली, शिवसेनेला टोला... 

त्यानंतर शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आमच्या हिंदुत्वाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात गरज पडेल तिथं शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील.

महाराष्ट्रात बाळासाहेबांनी ५५ वर्षांपूर्वी बेरोजगार आणि भूमीपुत्रांच्या मुद्द्यावर ठिणगी टाकली होती. आजचं राजकारण देखील याच मुद्द्यांवर केंद्रीत आहे. बिहार निवडणुकीत देखील हेच मुद्दे महत्त्वाचे होते.  

गेल्या वर्षी याच काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु होती. लोकांच्या मनात शंका होत्या. पण आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळार शिवसेनेचा मुख्यमंत्री तेसुद्धा उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या रुपाने मानवंदना देण्यासाठी आले आहेत. आजच्या दिवशी शिवसेनाप्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला. बाळासाहेब आमच्यात नाहीत ही वेदना कायम राहील. पण त्यांचे विचार, हिंदुत्व, मराठी बाणा आम्हाला सतत प्रेरणा देतील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा वारसा आम्ही पुढे नेऊ, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा- बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करू- अजित पवार

पुढील बातमी
इतर बातम्या