Advertisement

बाळासाहेबांना आदरांजली, शिवसेनेला टोला...

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला देखील लगावला आहे.

बाळासाहेबांना आदरांजली, शिवसेनेला टोला...
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतीदिनामित्त राज्यातील सर्वच पक्षांतील प्रमुख नेत्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. त्यानुसार विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला देखील लगावला आहे.

विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम! : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन.. अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना वंदन केलं आहे. परंतु सोबतच शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका देखील केली आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता- प्रवीण दरेकर

महाराष्ट्रात बरोबर वर्षभरापूर्वी शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील सत्ता वाटपावरून खासकरून मुख्यमंत्रीपदावरून दोघांचं बिनसलं होतं. यामुळे अनेक वर्षांपासूनची असलेली शिवसेना-भाजप मैत्री संपुष्टात आली. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदावरील दावा भाजपने अमान्य केल्याने अखेर शिवसेनेने (shiv sena) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यावरून भाजपकडून सातत्याने पाठीत खंजीर खुपसल्याची टीका शिवसेनेवर केली जाते. तर शिवसेनेकडून भाजपने दिलेला शब्द न पाळल्याचा दावा केला जातो.

त्यातच बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला (bjp) जनता दल युनायटेडपेक्षा जास्त जागा मिळूनही नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आल्याने. महाराष्ट्रातही जुन्या चर्चांना उत आला होता. त्यावर बिहारमध्ये भाजपने तसा शब्द दिला होता. परंतु महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कुठलाही शब्द दिलेला नव्हता, असा दावा भाजप आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

(opposition leader devendra fadnavis pays tribute to late bal thackeray)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा