Advertisement

महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता- प्रवीण दरेकर

महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कुठलाही शब्द दिलेला नव्हता, असा दावा भाजप आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता- प्रवीण दरेकर
SHARES

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला (bjp) जनता दल युनायटेडपेक्षा जास्त जागा मिळूनही नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री पदावर बसवण्यात येत आहे. बिहारमध्ये भाजपने तसा शब्द दिला होता. परंतु महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कुठलाही शब्द दिलेला नव्हता, असा दावा भाजप आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळवल्यानंतर आता भाजपने सत्ता हातात घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या शपथविधीचं आयोजनही करण्यात आलं आहे. बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते सलग चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. तर भाजपाकडून दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. खासकरून बिहारमध्ये भाजपला ७४ जागा आणि जेडीयूला त्यापेक्षा कमी म्हणजेच ४३ मिळूनही भाजपने मुख्यमंत्रीपद जेडीयूकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा- महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “कृष्णकुंज”

या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांना विचारलं असता, बिहारमध्ये आम्ही जेडीयूला शब्द दिला होता तो आम्ही पाळला. महाराष्ट्रात शिवसेनेला (shiv sena) आम्ही शब्द दिलाच नव्हता. भाजपने दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय कोणत्याही दबावामुळे घेतलेला नाही. बिहार हे मोठे राज्य आहे. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले आहेत. त्यातही महिलांचे प्रश्न समजून घेऊन निर्णय घेण्यासाठी महिला उपमुख्यमंत्री देण्यात आल्या आहेत, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात बरोबर वर्षभरापूर्वी शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील सत्ता वाटपावरून खासकरून मुख्यमंत्रीपदावरून दोघांचं बिनसलं होतं. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदावरील दावा भाजपने अमान्य केल्याने अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.

(bjp not promised shiv sena on sharing of chief minister post in maharashtra says pravin darekar)

हेही वाचा- मंदिरे उघडण्याचा निर्णय म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण- प्रवीण दरेकर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा