मी दाऊदला दम दिलाय- संजय राऊत

'मी दाऊद इब्राहिमला पाहिले असून, त्यांच्याशी बोललोय, इतकंच नाही त्याला मी दमही दिला आहे', असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली. एका जाहीर मुलाखतीत राऊत यांनी हे वक्तव्य केलं. 

पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत बोलत होते. आपल्या उमेदीच्या काळात पत्रकारिता करताना आलेले अनुभव सांगताना राऊत म्हणाले. समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड असो, मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचं कुणी वाकडं करून शकत नाही. म्हणूनच तर मी हिंमत असेल तर माझ्या अंगावर या असं थेटपणे आव्हान देतो.

पूर्वीसारखं अंडरवर्ल्ड आता राहिलेलं नाही. तेव्हाच्या काळातील अंडरवर्ल्ड वेगळं होतं. मुंबईचं अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होतं.  ते आम्ही पाहिलेलं आहे. मी दाऊद इब्राहिमपासून अनेकांचे फोटो काढलेत. त्या काळात  गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली यायचं, हे मी पाहिलंय. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या. लोकं मला एकेकाळी गुंड म्हणत असत अर्थात चांगल्या अर्थाने. बाळासाहेबही हे आमचे फायरब्रँड एडिटर अशी माझी ओळख करून द्यायचे.  पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, याच उद्देशाने ते असं म्हणायचे. असं राऊत म्हणाले.

हेही वाचा-

काश्मीर तोडण्याची भाषा सहन करणार नाही- संजय राऊत

आता शरद पवारांना करायचंय राष्ट्रपती! संजय राऊतांची नवी मोहीम

पुढील बातमी
इतर बातम्या