Advertisement

काश्मीर तोडण्याची भाषा सहन करणार नाही- संजय राऊत

विद्यार्थी आंदोलनात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे पोस्टर झळकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

काश्मीर तोडण्याची भाषा सहन करणार नाही- संजय राऊत
SHARES

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे मुंबईतही पडसाद उमटले. गेट वे आॅफ इंडिया परिसरात जमून विद्यार्थ्यांनी या हिंसाचाराचा निषेध केला. या विद्यार्थी आंदोलनात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे पोस्टर झळकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेना नेते खासदार यांनी काश्मीरला भारतापासून तोडण्याची भाषा कुठल्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असं म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली. 

हेही वाचा- JNU हिंसाचार: विद्यार्थ्यांचं मुंबईतील आंदोलन मागे

जेएनयू हल्ल्याविरोधात मागील २ दिवसांपासून गेट वे ऑफ इंडियावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन सुरू असताना सोमवारी रात्री एका तरूणीने 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकावलं. या पोस्टरवरून राजकारण पेटायला लागलं. हे आंदोलन फुटीरतावाद्यांच्या पाठिंब्यावर सुरू असल्याची टीका विरोधकांनी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 

त्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, गेट वे आॅफ इंडिया येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरचं पोस्टर झळकवण्यात आल्याचं मी वृत्तपत्रांत वाचलं. मात्र या पोस्टरचा वेगळा अर्थ काढण्यात येऊ नये. या पोस्टरच्या माध्यमातून काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाईल इ. वर लावण्यात आलेली बंदी उठवण्याची मागणी तरूणीकडून करण्यात आली. या व्यक्तीरिक्त काश्मीरला भारतापासून तोडण्याची कुणी भाषा करत असेल, तर ती सहन केली जाणार नाही.   

हेही वाचा- जेएनयू हल्ला: गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडही आंदोलनात सहभागी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा