Advertisement

JNU च्या निषेधार्थ मुंबईतील आंदोलन मागे

मुंबईच्या गेटवेवर विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांततेत आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला. मात्र 'गेट वे’वर कालांतराने या आंदोलनावर पोलिसांनी आक्षेप घेत, हे आंदोलन आझाद मैदान येथे करण्यास सांगितले.

JNU च्या निषेधार्थ मुंबईतील आंदोलन मागे
SHARES

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. या हल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी प्रथम गेट वे आँफ इंडिया येथे आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने या विद्यार्थ्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची विनंती करण्यात आली.  आझाद मैदानात हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर या आंदोलनाला पूर्णविराम देत असल्याची घोषणा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली.

मुंबईतील विद्यार्थ्यांचं गेल्या दोन दिवसांपासून 'गेट वे ऑफ इंडिया'वर जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनीही उपस्थिती लावली होती. या आंदोलनात सेलिब्रिटींनी उडी घेत कार्टररोडवर या घटनेचा निषेध नोंदवला. तर मुंबईच्या गेटवेवर विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांततेत आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला. मात्र 'गेट वे’वर कालांतराने या आंदोलनावर पोलिसांनी आक्षेप घेत, हे आंदोलन आझाद मैदान येथे करण्यास सांगितले. सुरूवातीला पोलिसांच्या प्रस्तावाला आंदोलनकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धर पकड करत त्यांना आझाद मैदान येथे नेले.

हेही वाचाः- मनसेला सर्व पर्याय खुले, नांदगावकरांनी दिले भाजपसोबत युतीचे संकेत?

 आम्ही कुणालाही त्रास न देता आंदोलन करत असतानाही पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीनं आझाद मैदानात आणलं. हजारो विद्यार्थ्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखलं आहे. गेट वेवरील आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, पण आमचा लढा यापुढेही असाच सुरू राहील', असं आंदोलक विद्यार्थी कपिल अग्रवाल याने सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा