Advertisement

आता शरद पवारांना करायचंय राष्ट्रपती! संजय राऊतांची नवी मोहीम

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आता नवी मोहीम हाती घेतली आहे.

आता शरद पवारांना करायचंय राष्ट्रपती! संजय राऊतांची नवी मोहीम
SHARES

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आता नवी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदी बसवण्याची. २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पवार यांच्या नावाचा विचार करावा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे. 

हेही वाचा- जेएनयूतील हल्ला बघून २६/११ ची आठवण झाली- उद्धव ठाकरे

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची मोर्चेबांधणी करण्यासाठी राऊत लवकरच पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळ राज्यांचा दौरा करून तेथील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते असल्याने सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांचा विचार करावा. त्यांच्या नावाला कुणी विरोध करणार नाही, अशा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

पवार यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय कौशल्य पाहता त्यांना भारताच्या घटनात्मक प्रमुखपदी बसवणं योग्य ठरेल. याबाबत लवकरच रणनीती आखली जाईल. २०२० साली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी आमच्याकडे आवश्यक तेवढे संख्याबळ असेल, असा दावाही राऊत यांनी केला.

हेही वाचा- मनसे लोणच्याएवढीही उरली नाही, शिवसेना नेत्याची राज ठाकरेंवर टीका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा