सोशल मीडियावर शिवसेना ट्रोल

गेल्या २५ वर्षांपासून असलेली भाजप-शिवसेनेची युती कायम आहे. दोन्ही पक्ष लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली.

आमच्यात मतभेद असले तरी हिंदुत्व आणि देशावरचं दहशतवादाचं संकट पाहता आम्ही पुन्हा एकदा एकत्र येत आहोत, असं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पण युतीची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर शिवसेनेला मात्र चांगलंच ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावर शिवसेना-भाजप कशी ट्रोल झाली हे पाहुयात.


हेही वाचा

'सत्तेला लाथ मारू' या वाक्याला श्रद्धांजली, राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी

शिवसेना-भाजप युतीचा सिक्वेल


पुढील बातमी
इतर बातम्या