Advertisement

'सत्तेला लाथ मारू' या वाक्याला श्रद्धांजली, राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. यानंतर विरोधकांकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

'सत्तेला लाथ मारू' या वाक्याला श्रद्धांजली, राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी
SHARES

सोमवारी भाजप आणि शिवसेना युतीची अखेर घोषणा झाली. गेल्या २५ वर्षांपासून असलेली भाजप-शिवसेनेची युती कायम आहे. दोन्ही पक्ष लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. यानंतर विरोधकांकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

पोस्टरद्वारे शिवसेनेवर हल्लाबोल

युतीची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर तर शिवसेना-भाजपला ट्रोल केलं जात आहेच. यात आता आणखीन भर पडली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मुंबईत शिवसेनेची खिल्ली उडवणारे पोस्टर लावले आहेत. सेनाभवन जवळ देखील हे पोस्टर लावण्यात आलं आहे. 'सत्तेला लाथ मारू' या ऐतिहासिक वाक्याला श्रद्धांजली, अशा आशयाची पोस्टर्स राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं लावली आहेत.


शिवसेना-भाजप ट्रोल

हिंदुत्व आणि देशावरचं दहशतवादाचं संकट अशी अनेक कारणं पुढे करत भाजप शिवसेना पुन्हा एकत्र लढणार आहे. गेली चार वर्ष शिवसेना-भाजपमध्ये काही मुद्द्यांवरून तु तु-मै मै सुरू होती. त्यामुळे यापुढे युती नाही शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. यासाठी सत्तेला लाथ मारावी लागेली तरी चालेल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती



हेही वाचा

शिवसेना-भाजप युतीचा सिक्वेल

मोदींच्या ‘मन की बात’ला काँग्रेसचे ‘जन की बात’द्वारे उत्तर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा