मोदींच्या ‘मन की बात’ला काँग्रेसचे ‘जन की बात’द्वारे उत्तर

मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याच्या गावागावात आणि चौकाचौकात ‘जन की बात’ कार्यक्रम करत भाजपची कोंडी करणार आहे.

SHARE

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलं असताना, सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सरकारकडून पाच वर्षातल्या कामांचा जाहिरातींच्या माध्यमातून सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करत आहे. मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याच्या गावागावात आणि चौकाचौकात ‘जन की बात’ कार्यक्रम करत भाजपची कोंडी करणार आहे.


निडणुकीसाठी समित्यांची स्थापन

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस २६ जागा लढवणार आहे. या २६ मतदारसंघातील जातीय गोळाबेरजेची माहिती पक्षानं तयार केली आहे. तसंच निडणुकीसाठी नेत्यांच्या ७ समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्यांच्या बैठका सध्या वारंवार होत आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सफाई कर्मचारी या सर्वांचे प्रश्न जाणून घेत ते प्रश्न जाहिरनाम्यात मांडून मतदारांना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांचा राहणार आहे.  


काँग्रेसची जोरदार तयारी

मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या नावाखाली तीनतेरा कसे वाजले? सामान्य माणसांची कशा प्रकारे फसणूक सरकारने केली? याविषयी सवालांचे मोहोळ काँग्रेसकडून उठवले जाणार आहे. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ला काँग्रेसकडून ‘जन की बात’ द्वारे प्रतिउत्तर देण्याची तयारी काँग्रेसनं केली असल्याचं समजतं. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनतेच्या सूचना +९१ ७०२००२३२३२ हा व्हाॅट्सअॅप क्रमांक आणि mahaincmanifesto2019@gmail.com -मेलवर मागवून घेतल्या आहेत.


राज्यातील निवडणुकीची धुरा 'या' काँग्रेस नेत्यांवर 

1. समन्वय समिती     : मल्लिकार्जुन खर्गे

2. निवडणूक समिती : अशोक चव्हाण 

3. कॅम्पेन समिती     : सुशीलकुमार शिंदे

4. प्रसिद्धी समिती    : रत्नाकर महाजन 

5. माध्यम समिती    : कुमार केतकर

6. जाहीरनामा समिती : पृथ्वीराज चव्हाण 

7. निवडणूक व्यवस्थापन : शरद रणपिसेहेही वाचा

निरूपम यांना हटवण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते दिल्लीत तळ ठोकून

युतीबाबत उद्धव ठाकरेंशी सकारात्मक चर्चा -मुख्यमंत्री

संबंधित विषय
ताज्या बातम्या