कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली- रमेश कदम

अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी ठाणे कारागृह प्रशासनावर एका कैद्याला जबर मारहाण करुन त्याला मानवी विष्ठा खायला लावल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतरच या कैद्याच्या प्रकृतीत बिघड झाला होता, असा दावा देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी कदम यांनी मानवाधिकार आयोगाला पत्र पाठवून तक्रार नोंदवली असून या पत्रातून हा सारा प्रकार बाहेर आला आहे.

काय आहे पत्रात?

ठाणे कारागृहात २७ जून रोजी एका कैद्याला कारागृहातील कर्मचाऱ्यांनी मारहाण करून मानवी विष्ठा खाण्यास जबरदस्ती केली, असा आरोप रमेश कदम यांनी पत्रात केला आहे. या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी कदम यांनी मानवाधिकार आयोगाला पत्र लिहिलं.

कारागृहाला समन्स

या पत्राची दखल घेत मानवाधिकार आयोगाने ठाणे कारागृह प्रशासनाला समन्स पाठविल असून २७ जूनचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती कदम यांनी केली आहे. संबंधित तुरूंग अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करणार असल्याचा इशारा कदम यांनी पत्रातून दिला आहे.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात ४०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप कदम यांच्यावर आहे.


हेही वाचा-

१ कोटींचे डॉलर नेणाऱ्याला विमानतळावर अटक

मुंबईतल्या महिला आयोगानं केली ओमानमधल्या भारतीय महिलेची सुटका


पुढील बातमी
इतर बातम्या