१ कोटींचे डॉलर नेणाऱ्याला विमानतळावर अटक


१ कोटींचे डॉलर नेणाऱ्याला विमानतळावर अटक
SHARES

दुबईला लपवून पैसे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. भूपेंद्र सिंह असं या व्यक्तीचं नाव असून तो जेट एअरवेजच्या विमानानं दुबईला जात होता.


कार्डबोर्डमध्ये गुंडाळले डाॅलर

 भूपेंद्र सिंह याच्याकडून १ लाख ४८ हजार ५०० अमेरिकन डॉलर म्हणजेच १ कोटी २ लाख ४ हजार १७७ रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. भुपेंद्र हे पैसे कार्डबोर्डमध्ये गुंडाळून नेत होता. याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुबईतून आणलेलं २ कोटी ६० लाख रुपयांचं सोनं पकडलं होतं. 

मुंबई विमानतळावर जेट एअरवेजच्या एका प्रवाशाच्या सीटमध्ये कोट्यवधी रुपयांचं सोनं असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार या सोनं तस्करीचा माग काढण्यासाठी गुप्तचर विभागाचे अधिकारी विमानात पोहचले. यावेळी सीटमध्ये  १२ गोल्डबार सापडले.



हेही वाचा -

झारखंडच्या मोबाइल चोरट्यांना अटक

अभिनेत्री किम शर्माची मोलकरणीला मारहाण



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा