झारखंडच्या मोबाइल चोरट्यांना अटक


झारखंडच्या मोबाइल चोरट्यांना अटक
SHARES

मुंबईत लोकलमध्ये मोबाइल चोरी करणाऱ्या झारखंडच्या तीन चोरट्यांना मध्य रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मुकेशकुमार महांतो (३१), इस्तीखार उमर शेख (१९) आणि उत्तमकुमार विनोद ठाकूर (२१) अशी या आरोपींची नावं असून त्यांच्याकडून १ लाख ८८ हजार ९९७ रुपयांचे मोबाइल जप्त केले आहेत.


मुंबईत भाड्यानं घर 

मध्य रेल्वेच्या लोहमार्ग पोलिसांनी २ जूनला या तिघांना मस्जिद बंदर स्थानकात अटक केली आहे. हे तिघे जण झारखंडहून मुंबईला यायचे आणि लोकलमध्ये मोबाइल चोरी करायचे. चोरी केलेले मोबाइल ते पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीला विकायला द्यायचे आणि पैसे कमवायचे. झारखंडहून आल्यानंतर ही टोळी मुंबईमध्ये राहण्यासाठी भाड्यानं घर विकत घ्यायची. चोरलेले मोबाइल विकल्यानंतर ते पुन्हा झारखंडला जायचे.



हेही वाचा -

अभिनेत्री किम शर्माची मोलकरणीला मारहा

भारताकडं सोपवण्याचं वृत्त निराधार - झाकीर नाईक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा