भारताकडं सोपवण्याचं वृत्त निराधार - झाकीर नाईक


भारताकडं सोपवण्याचं वृत्त निराधार - झाकीर नाईक
SHARES

धार्मिक भावना भडकावणे, तसंच मनी लाॅन्ड्रींग अादी अारोप असलेले मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांना मलेशियन सरकार बुधवारी भारत सरकारच्या ताब्यात देणार असल्याचं वृत्त पसरलं होतं. मात्र, झाकीर नाईक यांनी अापल्याला मलेशिया सरकार भारताकडे सोपवणार असल्याचं वृत्त फेटाळलं अाहे. माझा सद्यातरी भारतात परतण्याचा विचार नाही. भारतातील सरकार निष्पक्ष तपास करण्यास तयार असेल तेव्हाच मी भारतात परतेन, असं नाईक यांनी म्हटलं अाहे.


दहशतवाद्यांना भाषणातून प्रेरणा

झाकीर नाईक यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनअायए) २०१७ गुन्हा दाखल केला होता. एनअायए अाणि अंमलबजावणी महासंचालनालय (ईडी) नाईक यांची चौकशी करत अाहेत. २०१६ मध्ये ढाका येथे हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना नाईक यांच्या भाषणातून प्रेरणा मिळाली, असा अारोप त्यांच्यावर ठेवण्यात अाला अाहे. या हल्ल्यात एका भारतीय तरूणीसह २२ लोकांचा बळी गेला होता. नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेला २०१६ मध्ये बेकायदा ठरवण्यात अाले होते. या या संस्थेला मिळालेल्या १८ कोटी रुपयांच्या देणगीची ईडी चौकशी करत अाहे.



हेही वाचा -

खूशखबर! पुरूषांनाही मिळणार १८० दिवसांची बालसंगोपन रजा

अंधेरी ते चर्चगेट वाहतूक दिवसभर राहणार बंद




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा