केंद्राच्या एनआयए संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ – गृहमंत्री

केंद्राच्या एनआयए संदर्भातील पत्र राज्य शासनाकडे आले असून यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ असे गृहमंत्री (home minister) अनिल देशमुख (Anil deshmukh) यांनी म्हटले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवारांनी एसआयटी (SIT)ची मागणी केल्यानंतर हा तपास काढून घेण्यात आला. ज्या लोकांची नावं वगळण्यात आली ते यात अडकतील या भीतीने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असावा, अशी शंका देखील यावेळी त्यांनी उपस्थित केली.

हेही वाचाः- शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र, सुधीर मुनगंटीवार

भीमा कोरेगावच्या बाबतीत केंद्र सरकार(Central government)ने राज्याच्या माध्यमातून सुरू असलेला तपास थांबवून तो केंद्राकडे दिला. तसे पत्र आम्हाला आलेलं आहे पण ते माझ्यापयर्ंत आलेलं नाही. पत्र माझ्याकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे आल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊ, असे देशमुख म्हणाले. काही पूर्वग्रह मानसिकतेतून काही लोकांना यात गोवण्यातल आले आणि काही लोकांना वगळण्यात आल्याची शंका आमच्याकडे अनेक संघटनांनी व्यक्त केल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. सीएए विरोधात अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरू आहेत. लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक समाजाचे लोक आम्हाला येऊन भेटले. राज्यात एकाही नागरिकाला नागरीकत्व गमवावे लागणार नसल्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचाः- इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला होता, जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

पुढील बातमी
इतर बातम्या