Advertisement

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र, सुधीर मुनगंटीवार

भाजपाची आशा अजून मावळलेली नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तसं बोलून दाखवलं आहे.

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र, सुधीर मुनगंटीवार
SHARES

विधानसभा निवडणूकीनंतर सत्तास्थापनेवरून भाजप (BJP)शी युतीतोडून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीची मोट बांधत सत्तास्थापन केली. त्यानंतर भाजप-शिवसेने(Shivsena)कडून एकमेकांवर जोरदार चिखलफेक केली जात होती. मात्र पडद्याआडची वस्तूस्थिती काही वेगळीच असल्याचे (sudhir mungantiwar )सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून पुढे आले आहे. शिवसेना पुन्हा परत येईल, ही भाजपाची आशा अजून मावळलेली नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तसं बोलून दाखवलं आहे.

हेही वाचाः-आरे कारशेडवरील स्थगिती उठवा, देवेंद्र फडणवीसांची मागणी

“शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेनं उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून अडचण नाही,” असं मुनगंटीवार म्हणाले.भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार हे सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची सत्तास्थापनेची आणि शिवसेनेशी जवळीकता साधण्याची आशा अद्याप मावळलेली नसल्याचेसूचक वक्तव्य केले. पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले,”शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आताही शिवसेनेनं प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून अडचण नाही. ‘देर आये दुरूस्त आये, सुबह का भूला श्याम को आया’ असं आम्ही समजू,” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

हेही वाचाः- इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला होता, जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

 त्याचबरोबर “मनसेसोबत जाण्याबाबत मोठा खुलासा केला. ‘ मनसेसोबत जाणे आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही. पण, समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपाची भूमिका आहे,” असं सांगत त्यांनी मनसेबाबत भाजपाचं मत अनुकूल असल्याचंही अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं. शिवसेना-काँग्रेसच्या आघाडीविषयी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “शिवसेनेला काँग्रेसनं पाठिंबा देणं हे २१व्या शतकातील आश्चर्यच आहे. अशोक चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते सत्तेत गेले. मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तीशाली झाली,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला. “भिन्न विचारांचे सरकार दीर्घकाळ टिकत नाही, असा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. या सरकारची स्थिती व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासारखी आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

हेही वाचाः- आरे कारशेडचा अहवाल स्वीकारणं बंधनकारक नाही- आदित्य ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा