१८ फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारी ३० नोव्हेंबरला संपलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार येत्या १८ फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.

शुक्रवारी घोषणा

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाऴकर यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखेची घोषणा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २७ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील, अशी शक्यता आहे.

शेवटचा अर्थसंकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. कारण मे २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचाही पडघम वाजू लागणार आहे.


हेही वाचा- 

मराठा आरक्षण कायदा लागू, पण किती दिवस टिकणार?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू


पुढील बातमी
इतर बातम्या