ओला-उबरमुळे बेस्टही संकटात- उद्धव ठाकरे

ओला-उबरमुळे बेस्ट उपक्रमही संकटात आल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केलं. उद्धव यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमात दाखल झालेल्या ६ मिनी वातानुकूलित बसचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.  

अर्थमंत्रीही हतबल

ओला-उबर या खासगी वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या भारतात दाखल झाल्यापासून टॅक्सी, रिक्षा आणि बस या पारंपरिक वाहन सेवांना चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रवासी आरामदायी सेवेला प्राधान्य देत असल्याने जुन्या वाहन सेवांच्या अस्तित्वापुढं प्रश्नप्रश्न निर्माण झालं आहे. वाहन उद्योगही सध्या कठीण अवस्थेतून जात आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही दिवसांपूर्वी ओला-उबरलाच जबाबदार ठरवलं होतं.  

नोकरी जाणार नाही

त्यात भर घालताना उद्धव ठाकरे यांनी देखील आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या अवस्थेबद्दल ओला-उबरलाच जबाबदार ठरवलं आहे. सध्या देशात मंदी आहे. पण ही स्थिती दीर्घकाळ राहणार नाही. एक दिवस मंदीही जाईल. वाढत्या स्पर्धेनुसार बेस्ट उपक्रमातही सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यानुसार या सुधारणाही होत आहेत, असं ते म्हणाले. सोबतच कितीही संकट आलं तरी बेस्टच्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नसल्याचं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं.


हेही वाचा-

बेस्टच्या ताफ्यात आल्या ६ मिनी बस, बघा 'असा' आहे लूक

एसटीची शिवा'ई'-बस


पुढील बातमी
इतर बातम्या