Advertisement

बेस्टच्या ताफ्यात आल्या ६ मिनी बस, बघा 'असा' आहे लूक

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता लवकरच मिनी एसी बसमधून प्रवासाची संधी मिळणार आहे.

बेस्टच्या ताफ्यात आल्या ६ मिनी बस, बघा 'असा' आहे लूक
SHARES
Advertisement

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता लवकरच मिनी एसी बसमधून प्रवासाची संधी मिळणार आहे. कारण नवी मिनी एसी बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली आहे. एकूण ६ बस दाखल झाल्या असून, सोमवारपासून या नवीन ६ एसी मिनी बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

लोकार्पण सोहळा

या मिनी एसी बस सेवांचा लोकार्पण सोहळा बेस्टच्या कुलाबा येथील मुख्यालयात पार पडणार आहे. या सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी उपस्थित राहणार आहेत.

प्रकल्पांना हिरवा कंदील 

येत्या काही महिन्यांत बेस्टचा बसताफा सध्याच्या ३,५०० वरून थेट ६ हजारांपर्यंत नेण्याची योजना आहे. यापैकी काही बस टप्प्याटप्प्यांत दाखल होत आहेत. त्यानुसार, बेस्टच्या ताफ्यात नव्यानं सामील होणाऱ्या बसगाड्यांमध्ये इलेक्ट्रिकल बसचा देखील समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वेगवेगळ्या सुविधा, प्रकल्प, योजनांना हिरवा कंदील दाखवला जात आहे.हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोल वसूलीसाठी नवी कंपनी

दिव्यांग प्रवाशांसाठी एसटीच्या बस थांब्यावर व्हीलचेअरसंबंधित विषय
Advertisement