Advertisement

आता नवी कंपनी वसूल करणार मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोलवसूली करण्यासाठी लवकरच एका नव्या कंपनीची निवड करण्यात येणार आहे.

आता नवी कंपनी वसूल करणार मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोल
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोलवसूली करण्यासाठी लवकरच एका नव्या कंपनीची निवड करण्यात येणार आहे. याआधी सन २००५ वर्षापासून या टोलवसुलीचं कंत्राट आयआरबी कंपनीकडं होतं. मात्र, आता आयआरबी कंपनीचा करार ऑगस्ट महिन्यात संपुष्टात आला. त्यामुळं २०३० वर्षापर्यंत नव्या कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात येणार आहे.

निविदा प्रक्रिया सुरू

या टोलवसूलीच्या नव्या कंपनीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया ऑक्टोबर २०१९ अखेरपर्यंत संपून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नव्या कंत्राटदार कंपनीची निवड होणार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नवी वाढ लागू 

सध्यस्थितीत ३ महिन्यांच्या काळात टोलवसुली करण्यासाठी निविदा मागवून ग्लोबल सहकार कंपनीकडं तात्पुरत्या स्वरूपात टोल वसुलीचं कंत्राट देण्यात आलं आहे. दरम्यान, टोलच्या दरात दर ३ वर्षांनी १८ टक्के वाढ होत असते. या आधी २०१७ मध्ये वाढ झाली होती. आता ३१ मार्च २०२० मध्ये नवी वाढ लागू होणार आहे.


टोलचे दर

सन २००५ ते २००८ दरम्यान चारचाकी वाहनांसाठी ११८ रुपये टोल होता. २००८ ते २०११मध्ये १४० रुपये, २०११ ते २०१४ मध्ये १६९ रुपये, २०१४ ते २०१७ मध्ये १९५ रुपये, २०१७ ते २०२० पर्यंत २३० रुपये टोल आहे. सन २०२० ते २०२३ दरम्यान २७०, २०२३ ते २०२५ दरम्यान ३२० रुपये असा टोल असणार असल्याची माहिती समोर येत आहे.हेही वाचा -

आरेतील मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडला मुंबईकरांचा विरोध

दिव्यांग प्रवाशांसाठी एसटीच्या बस थांब्यावर व्हीलचेअरसंबंधित विषय
Advertisement