Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

आरेतील मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडला मुंबईकरांचा विरोध


आरेतील मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडला मुंबईकरांचा विरोध
SHARES

मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीतील मेट्रो ३ या प्रकल्पासाठी कारशेड उभारण्यात येणार आहे. या कारशेडसाठी तब्बल २७०० झाडं तोडली जाणार आहेत. मात्र, ही झाडं तोडू नये यासाठी विविध स्तरावरून विरोध केला जात आहे. पर्यावरणवादी संघटना, राजकीय पक्ष आणि मुंबईकर एकवटले आहेत. रविवारी याविरोधात आरेमध्ये सर्वांनी एकत्र येत आंदोलन केलं.'मुंबईच्या फुप्फुसांना वाचवा, मुंबई वाचवा' अशी घोषणा देत कारशेड विरोधात आंदोलन केलं.

कारशेडला विरोध

मेट्रो ३ या प्रकल्पासाठीच्या आरेतील कारशेडला विरोध करत पर्यावरणवाद्यांनी आरेतील रस्त्यावर मानवी साखळी तयार केली. या साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी सहभाग घेतला होता. पर्यावरणवाद्यांनी प्रस्तावित कारशेडच्या जागेवरील एका झाडाला रिंगण करत अनोखं आंदोलन करण्यात आलं.

कारशेड आरेमध्येच का?

'कांजूरमार्ग येथील पर्याय एमएमआरसीकडं उपलब्ध असताना कारशेड आरेमध्येच का उभारण्यात येत आहे', असा सवाल पर्यावरणवादी संघटनांनी उपस्थित केला. त्याशिवाय, 'जोपर्यंत येथील कारशेड दुसरीकडं हलवत नाही आणि झाडे तोडण्यास दिलेली परवानगी रद्द करत नाही तोपर्यंत आमचा विरोध आम्ही सुरू ठेवणार' असल्याचे पर्यावरणवादी संघटनांनी स्पष्ट केलंआरे वाचवा मुंबई वाचवा, आरे बचाव कारशेड हटाव, बचाएंगे आरे तो बचेंगे हम सारे, सेव्ह आरे, अशा घोषणा या वेळी आंदोलकांमार्फत देण्यात आल्या.

हरित फुप्फुसे नष्ट

मेट्रोमुळं मुंबईची हरित फुप्फुसे नष्ट होणार नसून कारशेड हे फक्त ३० हेक्टरमध्ये बांधण्यात येणार आहे. केवळ २ हजार ६४३ वृक्षांची पडझड होणार असल्याचं एमएमआरसीनं याआधी स्पष्ट केलं होतं. परंतु, यावर केवळ ३० हेक्टर जमीन हे चुकीचं विधान आहे. कारशेडची प्रत्यक्ष जागाच ६५ हेक्टर आहे. यावर हजारपेक्षाही जास्त वृक्ष आहेत, असा दावा पर्यावरणवाद्यांनी केला आहे. हेही वाचा -

Mutual Fund भाग ५ : सुरक्षित गुंतवणुकीसाठी निवडा 'हे' डेट फंडसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा